Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 102
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः
देवता - अदितिः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
9
उ꣣त꣢꣫ स्या नो꣣ दि꣡वा꣢ म꣣ति꣡रदि꣢꣯तिरू꣣त्या꣡ग꣢मत् । सा꣡ शन्ता꣢꣯ता꣣ म꣡य꣢स्कर꣣द꣢प꣣ स्रि꣣धः꣢ ॥१०२॥
स्वर सहित पद पाठउ꣣त꣢ । स्या । नः꣣ । दि꣡वा꣢꣯ । म꣣तिः꣢ । अ꣡दि꣢꣯तिः । अ । दि꣣तिः । ऊत्या꣢ । आ । ग꣢मत् । सा꣢ । श꣡न्ता꣢꣯ता । शम् । ता꣣ता । म꣡यः꣢꣯ । क꣣रत् । अ꣡प꣢꣯ । स्रि꣡धः꣢꣯ ॥१०२॥
स्वर रहित मन्त्र
उत स्या नो दिवा मतिरदितिरूत्यागमत् । सा शन्ताता मयस्करदप स्रिधः ॥१०२॥
स्वर रहित पद पाठ
उत । स्या । नः । दिवा । मतिः । अदितिः । अ । दितिः । ऊत्या । आ । गमत् । सा । शन्ताता । शम् । ताता । मयः । करत् । अप । स्रिधः ॥१०२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 102
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - आता पुढील मंत्राची देवता अदिति - या मंत्रात परमेश्वराला जगन्मातेच्या रूपात पाहून तिचे वर्णन केले आहे -
शब्दार्थ -
(उत) आणि (स्या) ती (मतिः) सर्व काही जाणणारी (अदितिः) अखंडकीय जगन्माता (ऊत्था) आपल्या रक्षण सामर्थ्यासह (नः) आमच्याकडे (आ गमत्) येवो. (सा) ती (शन्ताता) सर्व शान्तिपूर्ण कर्मांमध्ये मला (मयः) सुख व साफल्य (करत) देवो तसेच (स्रिधः) आमच्या हिंसा- वृत्तीला आणि हिंसक जनांना आमच्यापासून (अप) दूर करो (अशी आम्ही कामना करतो) ।। ६।।
भावार्थ - हे शतकर्मन् (शेकडो प्रकारचे कर्म करणाऱ्या परमेश्वरा) तूच आमचा पिता आणि तूच आमची माता आहेस (सामवेद ११७) सामवेदाच्या या मंत्रात ईश्वराला माता म्हटले आहे. ती आमची माता आहे, हाच भाव या मंत्रातील ङ्गअदितिफ नावाने वर्णित आहे. ती जगन्माता अदिति आहे कारण ही कधी खंडित होत नाही. ती सेदा, अदीन, अजर, अमर व मित्य आहे व असते. या मंत्रात तिला अशी प्रार्थना केली आहे की विलाप, लूटमार, हाहाकार यांनी भरलेल्या या जगात त्या मातेने कृपा करून सर्व शांति प्रिय सज्जनांद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना सफल करावे आणि अशा प्रकारे समस्त भूमंडळावर सुखाची वृष्टी करावी. तसेच त्या जगन्मातेने आपल्या शुभ प्रेरणेने हिंसक जनांनाही धर्मात्मा करावे. ।। ६।।
इस भाष्य को एडिट करें