Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 125
ऋषिः - सुकक्षश्रुतकक्षौ देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
6

उ꣢꣫द्घेद꣣भि꣢ श्रु꣣ता꣡म꣢घं वृष꣣भं꣡ नर्या꣢꣯पसम् । अ꣡स्ता꣢रमेषि सूर्य ॥१२५॥

स्वर सहित पद पाठ

उ꣢त् । घ꣣ । इ꣢त् । अ꣣भि꣢ । श्रु꣣ता꣡म꣢घम् । श्रु꣣त꣢ । म꣣घम् । वृषभ꣢म् । न꣡र्या꣢꣯पसम् । न꣡र्य꣢꣯ । अ꣣पसम् । अ꣡स्ता꣢꣯रम् । ए꣣षि । सूर्य ॥१२५॥


स्वर रहित मन्त्र

उद्घेदभि श्रुतामघं वृषभं नर्यापसम् । अस्तारमेषि सूर्य ॥१२५॥


स्वर रहित पद पाठ

उत् । घ । इत् । अभि । श्रुतामघम् । श्रुत । मघम् । वृषभम् । नर्यापसम् । नर्य । अपसम् । अस्तारम् । एषि । सूर्य ॥१२५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 125
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (सूर्य) सूर्यासम प्रकाशमान आणि प्रकाशकर्ता, चराचरगामी, अंतर्यामी, सद्बुद्धिप्रेरक आणि तमोगुणाला प्रकंपित करणारे परमेश्वर (त्वम्) आपण (घ) निश्चयाने (अवश्यमेव) (श्रृतामघम्) वेदादी शास्त्रांचे ज्ञान, हेच ज्याचे धन आहे, त्या (वऋषभम्) विद्या, धन आदींची वृष्टी करणाऱ्या तसेच (नर्यापसम्) जनहितकारी कार्यात तल्लीन आणि (असातरम्) सर्व विघ्न वाभावादींना दूर सारणाऱ्या मनुष्याच्या (अभि) दिशेला वा त्याकडे (उद् एषि) उदित होता म्हणजे त्याच्या हृदयात प्रकट होता. ।। १।।

भावार्थ - भौतिक सूर्य तर विद्वान - अविद्वान, दानी-कृषण, परोपकारी - स्वार्थी, विजयी - पराजित सर्वांसाठी उदित होतो, पण परमात्मरूप सूर्य त्या लोकांच्याच हृदयात प्रकाशित होतो की जे वेदादी श्रेष्ठ शास्त्रांचे श्रवण यासच सर्वश्रेषठ धन मानतात, जे स्व-अर्जित विद्यादी - वैभव आणि भौतिक संपदा मेघमंडळाप्रमाणे सर्वत्र सर्वांसाठी वितरित करतात. परमेश्वर रूप सूर्य त्यांच्याच हृदयात प्रकाश देतो की ज्यांचे कर्मे जनकल्याणकारी असतात आणि जे भीषणाहून भीषण शत्रूला तसेच मोठ्याहून मोठ्या विपत्तीला स्वसामर्थ्याने परास्त करण्याची हिंमत बाळगतात. ।। १।।

इस भाष्य को एडिट करें
Top