Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 135
ऋषिः - कण्वो घौरः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
13
इ꣣हे꣡व꣢ शृण्व एषां꣣ क꣢शा꣣ ह꣡स्ते꣢षु꣣ य꣡द्वदा꣢꣯न् । नि꣡ यामं꣢꣯ चि꣣त्र꣡मृ꣢ञ्जते ॥१३५॥
स्वर सहित पद पाठइ꣣ह꣢ । इ꣣व । शृण्वे । एषाम् । क꣡शाः꣢꣯ । ह꣡स्ते꣢꣯षु । यत् । व꣡दा꣢꣯न् । नि । या꣡म꣢꣯न् । चि꣣त्र꣢म् । ऋ꣣ञ्जते ॥१३५॥
स्वर रहित मन्त्र
इहेव शृण्व एषां कशा हस्तेषु यद्वदान् । नि यामं चित्रमृञ्जते ॥१३५॥
स्वर रहित पद पाठ
इह । इव । शृण्वे । एषाम् । कशाः । हस्तेषु । यत् । वदान् । नि । यामन् । चित्रम् । ऋञ्जते ॥१३५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 135
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सैनिक पर) (एषाम्) या सैनिकांच्या (हस्तेषु) हातात युद्धकाळी (यत्) जे (कशाः) चाबुक (वदान्) आहेत, त्यांचा आवाज (इह इव) जणू काय इथेच नव्हे, तर युद्धक्षेत्राहून भिन्न स्थळांपर्यंत (शृण्वे) घुमताना मी (एक नागरिक) ऐकत आहे. हे सैनिक दल (यामन्) संग्रामामध्ये (चित्रम्) अद्भुत (निऋज्जते) वेध धारण करत (त्यांचे प्रसाधन चित्र - विचित्र असते.)
वेदांमध्ये सैनिकांच्या वेश प्रसाधनाचे स्वरूप या प्रकारे वर्णित आहे - ‘‘हे सैनिकहो, तुमच्या खांद्यावर ऋष्टी आहेत. पायांमध्ये पादत्राणे आहेत. वक्षःस्थळावर सोन्याचे पदक असून तुम्ही रथावर आरूढ रूपाने शोभायमान आहात. तुमच्या बाहूमध्ये अग्नीप्रमाणे दीप्ती असणारा विद्युत अस्त्रे आहेत आणि शिरावर सोनेरी फेटा वा पागोटे आहे. ‘ऋ. ५/ ५४/ ११
‘तुम्ही उत्कृष्ट शस्त्रांची समृद्ध आहात, गतिमान आहात आणि तुम्ही उत्कृष्ट स्वर्णालंकार धारण केलेले आहेत.’
द्वितीय अर्थ - (प्राणपरक) - (एषाम्) या प्राणांच्या (हस्तेषु) पूरक- कुम्भक क्रियारूप हातांमध्ये (यत्) ज्या (कशाः) कानांनी न ऐकू येणाऱ्या अशा ज्या सूक्ष्म वाणी (वदान्) ध्वनित होतात, त्या ध्वनीला (इह इव) जणू काय इथेच म्हणजे प्राणायामाव्यतिरिक्त अवस्थेतदेखील मी (एक योगसाधक) (शृण्वे) ऐकत आहे. हा प्राणसमूह (पंचप्राण) (यामन्) अभ्यास मार्गात (चित्रम्) अद्भुत रूपेण (निऋज्जते) प्राणायाम अभ्यासी योग्याला विविध योग ऐश्वर्याने अलंकृत करतो. ।। १।।
भावार्थ - ज्याप्रमाणे राजाचे सहकारी सैनिक राष्ट्राची रक्षा करतात, तद्वत योगीजनाचे प्राण योगीच्या योगाची रक्षा करतात. युद्धांमध्ये शत्रुसैन्यासमोर सैनिकांचे चाबुक मोक्ष फटकाऱ्याचा आवाज करतात ते ज्या लोकांनी ऐकले आहे, ते त्या ध्वनीच्या भीषणाने प्रभावित होऊन त्यांना युद्धक्षेत्राहून वेगळ्या स्थानी गेल्यानंतरही त्याच भीषणतेचा अनुभव येत असतो. जणू काय ते तिथेदेखील तो ध्वनी ऐकत आहेत, असा त्यांना भास होतो. सैनिकांचा नीरोचित वेश विन्यासदेखील अद्भुत वाटतो. प्राण हेदेखील योगी व्यक्तीचे सैनिक आहेत, जे शरीरात उत्पन्न सर्व दोष काढून टाकतात, इन्द्रिये निर्मळ करतात आणि योगेश्वर्य प्राप्तीचे यत्न यशस्वी करतात. ।। १।।
विशेष -
या मंत्रात भूतकाळातील वस्तूंचे (सैनिकांची वेशभूषा, आदींचे) वर्तमानकाळात प्रत्यक्ष असल्याप्रमाणे वर्णन केले आहे, त्यामुळे इथे भाविक अलंकार आहे. (हस्तेषु, कशान्, यामन्) या शब्दाने प्राण व सैनिक असे दोन अर्थ असल्यामुळे या मंत्रात श्लेष अलंकारदेखील आहे.