Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 137
ऋषिः - वत्सः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
8
स꣡म꣢स्य म꣣न्य꣢वे꣣ वि꣢शो꣣ वि꣡श्वा꣢ नमन्त कृ꣣ष्ट꣡यः꣢ । स꣣मुद्रा꣡ये꣢व꣣ सि꣡न्ध꣢वः ॥१३७॥
स्वर सहित पद पाठस꣢म् । अ꣣स्य । मन्य꣡वे꣢ । वि꣡शः꣢꣯ । वि꣡श्वाः꣢꣯ । न꣣मन्त । कृष्ट꣡यः꣢ । स꣣मुद्राय । स꣣म् । उद्रा꣡य꣢ । इ꣣व । सि꣡न्ध꣢꣯वः । ॥१३७॥
स्वर रहित मन्त्र
समस्य मन्यवे विशो विश्वा नमन्त कृष्टयः । समुद्रायेव सिन्धवः ॥१३७॥
स्वर रहित पद पाठ
सम् । अस्य । मन्यवे । विशः । विश्वाः । नमन्त । कृष्टयः । समुद्राय । सम् । उद्राय । इव । सिन्धवः । ॥१३७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 137
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात असे वर्णऩ केले आहे की परमेश्वराचा मन्युसमोर सर्वांना नम्र व्हावे लागते -
शब्दार्थ -
ज्याप्रमाणे (सिन्धवः) नद्या (समुद्राय) समुद्रासमोर नत होतात म्हणजे निम्न भूमीकडे वाहत जातात, तद्वत (अस्य) या परमैश्वर्यवान पराक्रमी इन्द्र परमेश्वराच्या (मन्यवे) अन्याय, पाप आदींना सहन न करणाऱ्या (वा त्यांचे निराकरण करून त्यांना निस्तेज करणाऱ्या तेजासाठी म्हणजे ते तेज प्राप्त करण्यासाठी (विश्वाः) समस्त (कृषयः) कृषी करणारे म्हणजे मनोभूमीमध्ये सद्वुगणरूप बी पेरणारे (विशः) प्रजानन (सं नमन्त) परमेश्वरासमोर नत वा नम्र होतात (नम्र होऊन त्याची उपासना करतात. ।। ३।।
भावार्थ - मन्यू (क्रोधाचा) तो प्रकार आहे की ज्यामुळे माणूस अधर्म, दुराचार, पाप आदींना सहन करू शकत नाही आणि त्या अधमआर्दीचा नाश करण्यास उद्युक्त होतो. इन्द्र परमेश्वर त्या मन्यूचे आदर्श रूप आहे. अशा मन्युभावाचा जो कोष, अर्थात परमेश्वर, त्याच्या त्या मन्यूच्या प्राप्तीसाठी सर्वांनी नम्रपणे यत्न केले पाहिजेत ।। ३।।
इस भाष्य को एडिट करें