Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 156
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
4
प्र꣢ व꣣ इ꣡न्द्रा꣢य꣣ मा꣡द꣢न꣣ꣳ ह꣡र्य꣢श्वाय गायत । स꣡खा꣢यः सोम꣣पा꣡व्ने꣢ ॥१५६॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । वः꣣ । इ꣡न्द्रा꣢꣯य । मा꣡द꣢꣯नम् । ह꣡र्य꣢꣯श्वाय । ह꣡रि꣢꣯ । अ꣣श्वाय । गायत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । सोमपा꣡व्ने꣢ । सो꣡म । पा꣡व्ने꣢꣯ ॥१५६॥
स्वर रहित मन्त्र
प्र व इन्द्राय मादनꣳ हर्यश्वाय गायत । सखायः सोमपाव्ने ॥१५६॥
स्वर रहित पद पाठ
प्र । वः । इन्द्राय । मादनम् । हर्यश्वाय । हरि । अश्वाय । गायत । सखायः । स । खायः । सोमपाव्ने । सोम । पाव्ने ॥१५६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 156
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - पुन्हा इन्द्राचे गुणगान करण्याकरिता प्रजेला प्रेरणा केली आहे -
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपर) हे (सखायः) मित्रहो, (वः) तुम्ही (हर्य़श्वाय) ज्याने उत्पन्न केलेले घोडे, पशू अथवा सूर्य- चंद्र - वायू - मेघ - प्राण आदी अत्यंत वेगवान आहेत, अशा त्या (सोमपावने) भक्तिरूप सो मरसाचे सेवन करणाऱ्या आदी चंद्र आदी लोकांचे रक्षक त्या (इन्द्राम) परमैश्वर्यवान परमेश्वरासाठी (मादनम्) आनंददायी व तृप्तिदायी स्तोत्र ( प्र गायत) प्रकृष्टरूपएण गा (गायनामुळे आनंद व तृप्ती तुम्हाला होईल. तो परमेश्वर नित्य आनंदमय आहे. त्याच्या स्तुतिगानाने तुम्ही आनंद मिळवा.) ।।
द्वितीय अर्थ - (राजापर) हे (सखायः) माझ्या मित्राप्रमाणे असलेले प्रजाननहो (वः) तुम्ही (हर्षश्वाय) ज्याचे अश्वयान, अग्निवान, वायुयान, विद्युतमान आदी यान अत्यंत वेगवान आहेत, त्या (सोम पाव्ने) राष्ट्रात ब्रह्म- क्षत्रांचे रक्षक आणि यज्ञाचे रक्षक असलेल्या (इन्द्राय) ऐश्वर्यशाली व शत्रुविदारक राजाकरिता वा त्याच्याविषयी (मादनम्) हर्षदायी व उत्साहकारक उद्बोधन गीत वा विजयगीत (प्र गायत) उत्तम रीतीने अवश्य गा ।। २।।
भावार्थ - सर्व मित्रांनी मिळून परमेश्वराचे स्तुतिगीत गायिले पाहिजे आणि प्रजाजनांनी युद्धारंभप्रसंगी वा विजयोत्सव प्रसंगी राजाकरिता उद्बोधन गीत आणि विजय गीत ताल, स्वर व लयीत गायिले पाहिजे. ।। २।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। २।।