Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 215
ऋषिः - श्रुतकक्ष आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
11

अ꣡त꣢श्चिदिन्द्र न꣣ उ꣡पा या꣢꣯हि श꣣त꣡वा꣢जया । इ꣣षा꣢ स꣣ह꣡स्र꣢वाजया ॥२१५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡तः꣢꣯ । चि꣣त् । इन्द्र । नः । उ꣡प꣢꣯ । आ । या꣣हि । शत꣡वा꣢जया । श꣣त꣢ । वा꣣जया । इषा꣢ । स꣣ह꣡स्र꣢वाजया । स꣣ह꣡स्र꣢ । वा꣣जया । ॥२१५॥


स्वर रहित मन्त्र

अतश्चिदिन्द्र न उपा याहि शतवाजया । इषा सहस्रवाजया ॥२१५॥


स्वर रहित पद पाठ

अतः । चित् । इन्द्र । नः । उप । आ । याहि । शतवाजया । शत । वाजया । इषा । सहस्रवाजया । सहस्र । वाजया । ॥२१५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 215
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ - परमात्मपर) - ज्या अर्थी आम्ही पूर्वीच्या मंत्रात वर्णऩ केल्याप्रमाणे शक्ती आदीची कामना करीत आपणास आमच्या मैत्रीरसाने सिंचित करीत आहोत, (अतः चित्) त्या अर्थी व त्यामुळेच हे (इन्द्र) परमेश्वर, आपण (शतवाजया) शेकडो प्रकारच्या शक्तीने युक्त आणि (सहस्त्र वाजया) सहस् विज्ञानमय (इषा) अभीष्ट आनंदरसाच्या धारांनी (नः) आम्हाला (उप आयाहि) प्राप्त व्हा. (आमच्या हृदयातील मैत्रीभाव व आनंद अधिकाधिक वृद्धिंगत होवो.) ।। द्वितीय अर्थ - (राजापर अर्थ) - हे (इन्द्र) शत्रुनाशक धनपती राजा, (अतः चित्) आपल्या ठिकाणाहून (राजधानीहून) (शतवाजया) अत्यंत शक्तिमयी व वेगवती तसेच (सह्त्र वाजया) एकाच वेळी हजारो सैन्यांशी युद्ध करण्यात समर्थ अशा तुमच्या बलवती (इषा) सेनेसह (नः) आमच्याकडे की जे आम्ही शत्रूद्वारे अत्यंत पीडित व त्रस्त आहोत, त्यांना (उप आयाहि) प्राप्त व्हा. (त्वरित आमच्या रक्षणासाठी धावून या.)।। तृतीय अर्थ - (आचार्यपर) हे (इन्द्र) अविद्यानाशक आणि ज्ञानसंपन्न आचार्य प्रवर (त्वम्) आपण (अतः चित्) आपल्या कुटीहून (शतवाजया) शेकडो शक्ती देत (सहस् वाजया) अत्यंत ज्ञानाने अत्यंत समृद्ध अशा (इषा) ब्रह्मचर्य आदी व्रतांचे पालन करण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देत वा देण्यासाठी आमच्या (विद्यालयाकडे) (उप आयाहि) या.।। २।।

भावार्थ - जसे एक राजा आपल्या बलवती सेनेसह प्रजेकडे रक्षणासाठी धावून येतो आणि एक आचार्य जसा बल, ज्ञान व सदाचार याविषयी प्रेरणा देण्यासाठी शिष्याकडे जातो, तद्वत परमेश्वर बल, विज्ञान (विशेष ज्ञान) आणि आनंद देण्यासाठी उपासकाच्या हृदय प्रदेशात अनुभूत होतो. ।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top