Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 228
ऋषिः - दुर्मित्रः कौत्सः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
13

क꣣दा꣡ व꣢सो स्तो꣣त्रं꣡ हर्य꣢꣯त आ꣡ अव꣢꣯ श्म꣣शा꣡ रु꣢ध꣣द्वाः꣢ । दी꣣र्घ꣢ꣳ सु꣣तं꣢ वा꣣ता꣡प्या꣢य ॥२२८॥

स्वर सहित पद पाठ

क꣣दा꣢ । व꣣सो । स्तोत्र꣢म् । ह꣡र्य꣢꣯ते । आ । अ꣡व꣢꣯ । श्म꣣शा꣢ । रु꣣धत् । वा꣡रिति꣢दी꣣र्घ꣢म् । सु꣣त꣢म् । वा꣣ता꣡प्या꣢य । वा꣣त । आ꣡प्या꣢꣯य ॥२२८॥


स्वर रहित मन्त्र

कदा वसो स्तोत्रं हर्यत आ अव श्मशा रुधद्वाः । दीर्घꣳ सुतं वाताप्याय ॥२२८॥


स्वर रहित पद पाठ

कदा । वसो । स्तोत्रम् । हर्यते । आ । अव । श्मशा । रुधत् । वारितिदीर्घम् । सुतम् । वाताप्याय । वात । आप्याय ॥२२८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 228
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (भौतिक वर्षापर) - दीर्घ काळापर्यंत पाूस न पडल्यामुळे जलाभावने व्यथित झालेला मनुष्य म्हणत आहे - हे (वसो) सर्वांना स्थान व घर देणाऱ्या इन्द्र परमेश्वरा, आम्ही पावसासाठी (स्तोत्रम्) आपणाकडे हे स्तोस्त्र वा प्रार्थना (हर्यते) पाठवीत आहोत. आता (कदा) केव्हा (रमशा) पावसाच्या पाण्याने भरलेली नदी वा कालवा (वाः) जलाला (आ अवरुधत्) अवरोध करून ते जल आमच्या शेतापर्यंत वाजलाशयापर्यंत आणतील, (याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत) मी (एक कृषक वा यजमान याने) (वाताप्याय) वर्षाजलासाठी (दीर्घम्) अति दीर्घ काळापासून (सुतम्) हा यज्ञ संपन्न केला आहे.।। द्वितीय अर्थ - (अध्यात्म - वृष्टिविषयी) - दिव्य आनंद रसाने परिपूर्ण परमेश्वराकडून आनंद रूप वृष्टीची कामना करीत एक साधक म्हणत आहे. हे (वसो) मी एक निर्धन, मला धन आणि निवासासाठी स्थान देणारे आपण हे जगदीश्वर, मी आनंद रस प्राप्तीसाठी (स्तोत्रम्) आपणापर्यंत स्तुतिवचने (हर्यते) पाठवीत आहे. आता मी वाट पाहत आहे की (कदा) केव्हा (रमशा) तुमच्याकडून वाहत येणारी आनंद रसधार (वाः) तो आनंद रस (आ अवरुधत्) आणून माझ्या हृदयरूप जलाशयात भरील. हे रसागार, चिरकालापासून दुःखरूप दावानलाने मी दग्ध होत आहे. (वाताप्याय) दिव्य आनंद वृष्टीच्या प्राप्तीसाठी मी (दीर्घम्) दीर्घ काळापर्यंत (सुतम्) माझ्या अंतःकरणातील श्रद्धारस प्रवाहित करीत अध्यात्म - यज्ञ निष्पन्न करीत आहे. तरीही ती आनंद रसाची वृष्टी हृदयावर का होत नाही ? ।।६।।

भावार्थ - जसे अनावृष्टी प्रसंगी लोक पावसाकरिता बृहद् वृष्टियज्ञ करतात, तद्वत हे प्रभु, तुमच्या आनंद रसाचा इच्छुक मी तो आनंद प्राप्त करण्यासाठी केव्हापासून दीर्घ ध्यान - यज्ञ करीत आहे. तरीही हे परमेश्वरा, तू आनंद वृष्टी का करीत नाहीस ? येऊ दे, होऊ दे, दिव्य आ्रनंदाचा तो पाऊस पडू दे अन्यथा विविध सांसारिक तापानी दग्ध झालेला मी जिवंत राहू शकणार नाही.।।६।।

इस भाष्य को एडिट करें
Top