Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 291
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
8

म꣣हे꣢ च꣣ न꣢ त्वा꣢द्रिवः꣣ प꣡रा꣢ शु꣣ल्का꣡य꣢ दीयसे । न꣢ स꣣ह꣡स्रा꣢य꣣ ना꣡युता꣢꣯य वज्रिवो꣣ न꣢ श꣣ता꣡य꣢ शतामघ ॥२९१॥

स्वर सहित पद पाठ

म꣣हे꣢ । च꣣ । न꣢ । त्वा꣣ । अद्रिवः । अ । द्रिवः । प꣡रा꣢꣯ । शु꣣ल्का꣡य꣢ । दी꣣यसे । न꣢ । स꣣ह꣡स्रा꣢य । न । अ꣣यु꣡ता꣢य । अ꣣ । यु꣡ता꣢꣯य । व꣣ज्रिवः । न꣢ । श꣣ता꣡य꣢ । श꣣तामघ । शत । मघ ॥२९१॥


स्वर रहित मन्त्र

महे च न त्वाद्रिवः परा शुल्काय दीयसे । न सहस्राय नायुताय वज्रिवो न शताय शतामघ ॥२९१॥


स्वर रहित पद पाठ

महे । च । न । त्वा । अद्रिवः । अ । द्रिवः । परा । शुल्काय । दीयसे । न । सहस्राय । न । अयुताय । अ । युताय । वज्रिवः । न । शताय । शतामघ । शत । मघ ॥२९१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 291
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(अद्रिवः) आनंद रूप मेघांचे स्वामी आणि आनंद रसाची वृष्टी करणाऱ्या हे इंद्र परमेश्वरा, (त्वा) तुला आम्ही (महेच) (शुल्काय) कितीही मोठ्या मूल्यावर (न) (परादीयसे) वेगळे वा दूर करू शकत नाही. (तुझ्या सामीप्यतेसाठी आम्ही कितीही मोठा त्याग करावयास तत्पर आहोत) हे (वज्रिवः) विज्ञानमयी नीती- नियमाप्रमाणे चालणाऱ्या परमेश्वरा, (न) (सहस्राय) हजार मुद्रा घेून अथवा (न) (अयुताय) दहा हजार मुद्रा घेून (म्हणजे काहीही झाले तरीही) तुला आम्ही सोडू शकत नाही. हे (शतामघ) अनंत संपदावान परमेश्वरा, (न) (शताय) दहा हजारांपेक्षा शतगुण म्हणजे दश लक्ष मुद्राएवढे मूल्य देऊनदेखील कोणी तुला आमच्यापासून दूर करीत असेल, तर ते आम्हाला नको. ।। ९।।

भावार्थ - या मंत्रात ‘अद्रिवः’ ‘वज्रिवः’ ‘शतामघ’ ही तीनही विशेषणे एकाच परमेश्वराची पण साभिप्राय अशी वापरली आहेत. म्हणून येथे ‘परिकर’ अलंकार आहे. जो परमेश्वर मेघवत् सुखवर्षक निश्चित नियमांप्रमाणे चालणारा आणि अनंत धनवान आहे. तो कितीही मोठी किंमत मिळाली, तरीही सोडण्यासारखा आहे काय ? ।। ९।।

इस भाष्य को एडिट करें
Top