Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 341
ऋषिः - गोतमो राहूगणः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
4
को꣢ अ꣣द्य꣡ यु꣢ङ्क्ते धु꣣रि꣢꣫ गा ऋ꣣त꣢स्य꣣ शि꣡मी꣢वतो भा꣣मि꣡नो꣢ दुर्हृणा꣣यू꣢न् । आ꣣स꣡न्ने꣢षामप्सु꣣वा꣡हो꣢ मयो꣣भू꣡न्य ए꣢꣯षां भृ꣣त्या꣢मृ꣣ण꣢ध꣣त्स꣡ जी꣢वात् ॥३४१॥
स्वर सहित पद पाठकः꣢ । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । यु꣣ङ्क्ते । धुरि꣢ । गाः । ऋ꣣त꣡स्य꣢ । शि꣡मी꣢꣯वतः । भा꣣मि꣡नः꣢ । दु꣣र्हृणायू꣢न् । दुः꣣ । हृणायू꣢न् । आ꣣स꣢न् । ए꣣षाम् । अप्सुवा꣡हः꣢ । अ꣣प्सु । वा꣡हः꣢꣯ । म꣣योभू꣢न् । म꣣यः । भू꣢न् । यः । ए꣣षाम् । भृत्या꣢म् । ऋ꣣ण꣡ध꣢त् । सः । जी꣣वात् ॥३४१॥
स्वर रहित मन्त्र
को अद्य युङ्क्ते धुरि गा ऋतस्य शिमीवतो भामिनो दुर्हृणायून् । आसन्नेषामप्सुवाहो मयोभून्य एषां भृत्यामृणधत्स जीवात् ॥३४१॥
स्वर रहित पद पाठ
कः । अद्य । अ । द्य । युङ्क्ते । धुरि । गाः । ऋतस्य । शिमीवतः । भामिनः । दुर्हृणायून् । दुः । हृणायून् । आसन् । एषाम् । अप्सुवाहः । अप्सु । वाहः । मयोभून् । मयः । भून् । यः । एषाम् । भृत्याम् । ऋणधत् । सः । जीवात् ॥३४१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 341
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - मंत्र-देवता इंद्र असून इंद्राला सत्य प्रिय आहे. म्हणून मंत्राचा विषय - सत्य।
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्मपर अर्थ) - (कः) असा कोण माणूस आहे की जो (अघ) आज (शिभीवतः) कर्मशील, निरालस्य, (भामिनः) तेजस्वी तसेच (दुर्हृणावून्) दुष्य राजेय (अप्सु वाहः) नदीच्या धारा सदृश असणाऱ्या विघ्न बाधांना दूर करीत पुढे जाणाऱ्या (मयोभून्) सुखप्रापक (गाः) ज्ञानेंद्रिय - कर्मेंद्रियरूप बैलांना (ऋतस्य) सत्यरूप रथाच्या (ध्रुरि) धुरीमध्ये (मुड्क्ते) जुंपू शकेल ? (प्रबळ इंद्रियांना कोणीतरी वश करू शकेल का ?नाठाळ बैलाला जसे गाडीत जुंपणे कठीण, तद्वत इंद्रिय दमनही अति कठीण कर्म आहे.) (एषाम्) गतिशील (एषाम्) या इंद्रियरूप बैलांच्या (आसन्) मुखामध्ये (यः) जो माणूस (भृत्याम्) त्यांच्या प्रत्येकाच्या ग्रहणीय विषयरूप जीविकाद्रव्याला (ऋणधत्) वाढवील (सः) तोच (जीवात्) प्रशस्त जीवन जगेल. (जसे नाठाळ बैलाच्या नाकात वेस़ण घालून त्यास वश आणतात, तद्वत इंद्रियांना वश करावे.)।।
येथे ‘सत्याच्या धुरीमध्ये’ या शब्दावरून सत्यावर रथाचा आरोप ध्वनित होत आहे. सत्याच्या जूमध्ये साधारण बैलांना जुंपता येत नाही, म्हणून बैलांवरून आरोप्य माण इंद्रिये येथे अभिप्रेत आहेत. इंद्रियांवर बैलांचा आरोप केल्यामुळे बैलांच्या मुखाची कल्पनादेखील येथे केली आहे. करिता इथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।।
द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर अर्थ) - (कः) कोण आहे जो (अघ) आज म्हणजे संकटकाळी (शिमीवतः) कर्मवीर (भामिनः) क्षात्र-तेजाने युक्त (दुर्हृणायून) दुष्पराजेय (अप्सुवाहः) युद्धाच्या काळी नदी, समुद्र आदींच्या जलावर जलयान, नावे व युद्धपोत घेऊन जाणाऱ्या तसेच (मयोभून्) शत्रूंना जिंकून राष्ट्रवासीजनांना सुखी करणाऱ्या (गाः) गतिशील सैनिकांना (ऋतस्य) राष्ट्ररूप यज्ञाच्या (धुरि) रक्षणरूप धुरीमध्ये (युड्क्ते) प्रयुक्त करील ? आशय असा की हे महान कर्म राजाच करू शकेल. (आसन्नेषाम्) ज्यांच्या भात्यामध्ये बाण आहेत म्हणजे ज्यांनी पुष्कळ शास्त्र संचचय केला आहे, अशा (़एषाम्) या सैनिकांचे (यः) (भृत्याम्) वेतन (यः) जो राजा वेळोवेळी वाढवील (सः) तो राजा (जीवात्) शत्रु-विजय संपादित करून प्रजेसह दीर्घकाळ जीवित राहील. ।। १०।।
भावार्थ - मनुष्यांनी सत्याचे ज्ञान आणि प्रचार यासाठी आपल्या आत्मा, मन, बुद्धी, प्राण आणि इंद्रिये यांचा यथोचित उपयोग करावा. तसेच राष्ट्राच्या शासकाने राष्ट्राचे जे रक्षक, त्या सैनिकांना उचित वेतन, पुरस्कार आदींद्वारे सत्कार केला पाहिजे. ।। १०।। या दशतीमध्ये तार्क्ष्य नावाने परमेश्वराचे स्मरण, इंद्र-पर्वत मुगलाची स्तुती आणि इंद्राचे स्तवन, त्याच्याशी सख्यत्वाची याचना, इंद्रियरूप गायींचे महत्त्व व राजा, सैनिक आदी अर्थांची सूचना यामुळे या दशतीतील विषयांच्या अर्थाशी मागील दशतीच्या विषयांशी संगती जाणावी.।। चतुर्थ प्रपाठकातील प्रथम अर्घाची पाचवी दशती समाप्त। चतुर्थ प्रपाठकाचे प्रथम अर्घ समाप्त. तृतीय अध्यायामधील अकरावा खंड समाप्त।।
विशेष -
या मंत्रात अध्यात्मपर आणि राष्ट्रपर असे दोन अर्थ वाच्य असल्यामुळे येथे श्लेष अलंकार आहे. ।। १०।।