Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 349
ऋषिः - तिरश्चीराङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
11
आ꣢ त्वा꣣ गि꣡रो꣢ र꣣थी꣢रि꣣वा꣡स्थुः꣢ सु꣣ते꣡षु꣢ गिर्वणः । अ꣣भि꣢ त्वा꣣ स꣡म꣢नूषत꣣ गा꣡वो꣢ व꣣त्सं꣢꣫ न धे꣣न꣡वः꣢ ॥३४९॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । त्वा꣣ । गि꣡रः꣢꣯ । र꣣थीः꣢ । इव । अ꣡स्थुः꣢꣯ । सु꣣ते꣡षु꣢ । गि꣣र्वणः । गिः । वनः । अभि꣢ । त्वा꣣ । स꣢म् । अ꣣नूषत । गा꣡वः꣢꣯ । व꣣त्स꣢म् । न । धे꣣न꣡वः꣢ ॥३४९॥
स्वर रहित मन्त्र
आ त्वा गिरो रथीरिवास्थुः सुतेषु गिर्वणः । अभि त्वा समनूषत गावो वत्सं न धेनवः ॥३४९॥
स्वर रहित पद पाठ
आ । त्वा । गिरः । रथीः । इव । अस्थुः । सुतेषु । गिर्वणः । गिः । वनः । अभि । त्वा । सम् । अनूषत । गावः । वत्सम् । न । धेनवः ॥३४९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 349
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - जगदीश्वराची स्तुती
शब्दार्थ -
(गिर्वणः) वाणीद्वारे वंदनीय अशा हे इंद्र परमेश्वरा, (सुतेषु) ज्ञान-कर्म - श्रद्धारूप सोमरस तयार करून (गिरः) माझी वाणी (त्वा) तुझ्यापर्यंत येऊन (आ तस्युः) स्थित झाल्या आहेत. (माझे मन तुझ्या श्रद्धेने व जहृा तुझ्या नावाने परिपूर्ण आहे.) (रथीः इव) नेमके त्याच रूपात ज्या रूपात रथः स्वामी रथावर आरूढ होतो. माझी वाणी (त्वा अभि) तुला उद्देशून (समनूषत) उत्तम प्रकारे स्तुती करीत आहे. जशा (धेनवः गावः) दूध पाजविण्यासाठी गायी आपापल्या (वत्सं न) वासराकडे पाहून हंबरतात. तद्वत माझी वाणी तुझ्याकडे पाहत आहे.।।८।।
भावार्थ - रथीजन ज्याप्रकारे रथाचा आश्रय घेतात, तद्वत स्तोताजनांच्या वाणीने परमेश्वराचा आश्रय घ्यावा व त्याला संबोधून स्तुती कशा प्रकारे प्रेमाने करावी, की जसे गाय आपल्या वासराकडे पाहून हंबरते.।। ८।।
विशेष -
या मंत्रात दोन उपमा अलंकार व अनुप्रास अलंकार आहे.।। ८।।