Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 417
ऋषिः - त्रित आप्त्यः देवता - विश्वेदेवाः छन्दः - पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
12

च꣣न्द्र꣡मा꣢ अ꣣प्स्वा꣢३꣱न्त꣡रा सु꣢꣯प꣣र्णो꣡ धा꣢वते दि꣣वि꣢ । न꣡ वो꣢ हिरण्यनेमयः प꣣दं꣡ वि꣢न्दन्ति विद्युतो वि꣣त्तं꣡ मे꣢ अ꣣स्य꣡ रो꣢दसी ॥४१७॥

स्वर सहित पद पाठ

च꣣न्द्र꣡माः꣢ । च꣣न्द्र꣢ । माः꣣ । अप्सु꣢ । अ꣣न्तः꣢ । आ । सु꣣पर्णः꣢ । सु꣣ । पर्णः꣢ । धा꣣वते । दिवि꣢ । न । वः꣣ । हिरण्यनेमयः । हिरण्य । नेमयः । पद꣢म् । वि꣣न्दन्ति । विद्युतः । वि । द्युतः । वित्त꣢म् । मे꣣ । अस्य꣢ । रो꣣दसीइ꣡ति꣢ ॥४१७॥


स्वर रहित मन्त्र

चन्द्रमा अप्स्वा३न्तरा सुपर्णो धावते दिवि । न वो हिरण्यनेमयः पदं विन्दन्ति विद्युतो वित्तं मे अस्य रोदसी ॥४१७॥


स्वर रहित पद पाठ

चन्द्रमाः । चन्द्र । माः । अप्सु । अन्तः । आ । सुपर्णः । सु । पर्णः । धावते । दिवि । न । वः । हिरण्यनेमयः । हिरण्य । नेमयः । पदम् । विन्दन्ति । विद्युतः । वि । द्युतः । वित्तम् । मे । अस्य । रोदसीइति ॥४१७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 417
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
(चन्द्रमा) चंद्रमा (अप्सु अन्तः) अंतरिक्षामध्ये आणि (सुपर्णः) सुंदर पंख म्हणजे किरणे असलेला सूर्य (दिवि) द्यूलोकात (आ धावते) सगळीकडे धावत आहे म्हणजे चंद्र स्वतःच्या धुरीवर फिरत असून त्याचबरोबर तो पृथ्वी व सूर्याच्या भोवतीही फिरत आहे. सूर्य मात्र केवळ आपल्या धुरीवर फिरत आहे. सर्वजण हे जाणतातच, पण हे (हिरण्यनेमयः) स्वर्णिम चक्रवन (विद्युतः) विघोतमान चंद्र, सूर्य, विद्युत आदी शक्तीसमूहांनो, (वः) तुम्हाला जो (पदम्) मति देतो, कक्षेत स्थिर करतो, त्याला मात्र (न विन्दति) कोणीही जमत नाही. हे (रोदसी) स्त्री - पुरुषहो, अथवा राजा - प्रजाजनहो, तुम्ही (मे) माझी (अस्य) ही गोष्ट (वित्तम्) समजून घ्या. तात्पर्य हे की ज्याच्या गतिशक्तीमुळे हे सर्व ग्रह - उपग्रह गतिमान आहेत. त्या इन्द्र परमेश्वराला तुम्ही जाणून घ्या.।। ९।।

भावार्थ - मनुष्यांनी प्राकृतिक पदार्थांच्या गती, प्रकाश आदींविषयी ज्ञान प्राप्त करूनच समाधान मानू नये, तर हादेखील विचार करावा की या पदार्थांचा उत्पत्ति कर्ता आणि नियामक, व्यवसपकदेखील कोणीतरी अवश्य आहे.।। ९।। या मंत्राची व्याख्या करताना विवरणकार माधव याने त्रित संबंधीचा तोच इतिहास लिहिला आहे. (तो इतिहास मं. सं. ३६८ च्या खाली लिहिलेला आहे.) भरतस्वामी याने त्याहून भिन्न इतिहास सांगितला आहे - ‘‘एकत, द्वित आणि त्रित हे तिघे आप्त ऋषीचे पुत्र होते. जेव्हा ते यज्ञ संपन्न करून, दान म्हणून मिळालेल्या गायी घेऊन परत जात होते, तेव्हा वाळवंटात ते तहानेने व्याकूळ झाले. तिथे एक विहीर पाहून ते तिथेच थांबले. विहिरीत उतरायचा विचार करू लागले. आधी त्रित विहिरीत उतरला. दुसऱ्या दोघांना बाहेरच पाणी मिळाले. ते पाणी पिऊन तृप्त झाले आणि विहिरीला एका चक्राने बंद करून ते दोघे गायी घेऊन चालते झाले. तिकडे विहिरीत अडकून पडलेला त्रित देवांची स्तुती करू लागला. विहिरीत पाणी नव्हते म्हणून त्रित तहानेने खूपच व्याकूळ होऊ लागला. तो रात्री ंद्राला पाहून विलाप करू लागला की चंद्र पाम्यात का नाही, अंतरिक्षात मात्र तो व्यर्थच पळत आहे. - आदि। हा मंत्र म्हणजे त्रितचा विलाप आहे. तो म्हणत आहे ‘हा। कसे तरी करून माझी तृषा शांत व्हावी.’’ आकाशाला व भूमीला उद्देशून तो म्हणत आहे ‘‘तुम्ही दोघे माझी संकटावस्था ओळखा.’’ येथे हे उघड होत आहे की माधव आणि भरतस्वामी दोघांनी दाखविलेला इतिहासात एकमेकांशी विरोध असून तो केवळ त्यांच्या कल्पनेतील उत्पत्ती आहे. (वास्तविक पाहता निसर्गातील ग्रह - उपग्रह आदींचे विज्ञान व परमेश्वर नावाच्या नित्य सत्तेचे महन ज्ञान या मंत्रात सांगितले आहे, पण तो वास्तविक अर्थ न समजून केवळ कथा जंजाल निर्माण करणे वेदांवर अन्याय नाही का ?)

इस भाष्य को एडिट करें
Top