Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 476
ऋषिः - असितः काश्यपो देवलो वा देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
29

प꣡रि꣢ प्रि꣣या꣢ दि꣣वः꣢ क꣣वि꣡र्वया꣢꣯ꣳसि न꣣꣬प्त्यो꣢꣯र्हि꣣तः꣢ । स्वा꣣नै꣡र्या꣢ति क꣣वि꣡क्र꣢तुः ॥४७६॥

स्वर सहित पद पाठ

प꣡रि꣢꣯ । प्रि꣣या꣢ । दि꣣वः꣢ । क꣣विः꣢ । व꣡याँ꣢꣯सि । न꣣प्त्योः꣢ । हि꣣तः꣢ । स्वा꣣नैः । या꣣ति । कवि꣡क्र꣢तुः । क꣣वि꣢ । क्र꣣तुः ॥४७६॥


स्वर रहित मन्त्र

परि प्रिया दिवः कविर्वयाꣳसि नप्त्योर्हितः । स्वानैर्याति कविक्रतुः ॥४७६॥


स्वर रहित पद पाठ

परि । प्रिया । दिवः । कविः । वयाँसि । नप्त्योः । हितः । स्वानैः । याति । कविक्रतुः । कवि । क्रतुः ॥४७६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 476
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
(नप्त्योः हित) द्यावापृथिवीचा अथवा प्राण अपानाचा हितकारी, (कविः) क्रांतद्रष्टा (कविक्रतुः) बुद्धिपूर्ण कर्मे करणारा आणि रसागार तो परमात्मा (स्वानैः) अभिषुत आनंद रसांसह (दिवः) ग्योतमान जीवात्म्याच्या (प्रिया वयांसि) प्रिय मन, बुद्धी आदी लोकात (परि याति) व्याप्त होतो. (जीवात्मा परमात्म्याच्या आनंदाचा अनुभव घेऊ लागतो, अशी स्थिती योगी साधकास प्राप्त होते.)।। १०।।

भावार्थ - रसनिधी परमेश्वराचा दिव्य आनंद जेव्हा आत्म्यात व्याप्त होतो, तेव्हा आत्म्याशी संबद्ध मन, बुद्धी आदी जणू काय आनंदाने नृत्य करू लागतात.।। १०।। या दशतीत परमात्मरूप पवमान सोमाचे आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या आनंद रसाचे वर्णन आहे. यापूर्वीच्या दशतीतदेखील इंद्र, सूर्य, अग्नी, पवमान आदी नावाने परमात्म्याचेच वर्णन केले आहे. यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती आहे, असे जाणावे.।। पंचम प्रपाठकतील द्वितीय अर्धची चतुर्थ दशती समाप्त। पंचम अध्यायातील प्रथम खंड समाप्त।।

इस भाष्य को एडिट करें
Top