Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 534
ऋषिः - पराशरः शाक्त्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
8
प्र꣢ ते꣣ धा꣢रा꣣ म꣡धु꣢मतीरसृग्र꣣न्वा꣢रं꣣ य꣢त्पू꣣तो꣢ अ꣣त्ये꣡ष्यव्य꣢꣯म् । प꣡व꣢मान꣣ प꣡व꣢से꣣ धा꣡म꣢ गो꣡नां꣢ ज꣣न꣢य꣣न्त्सू꣡र्य꣢मपिन्वो अ꣣र्कैः꣢ ॥५३४॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । ते꣣ । धा꣡राः꣢꣯ । म꣡धु꣢꣯मतीः । अ꣣सृग्रन् । वा꣡र꣢꣯म् । यत् । पू꣣तः꣢ । अ꣣त्ये꣡षि꣢ । अ꣣ति । ए꣡षि꣢꣯ । अ꣡व्य꣢꣯म् । प꣡व꣢꣯मान । प꣡व꣢꣯से । धा꣡म꣢꣯ । गो꣡ना꣢꣯म् । ज꣣न꣡य꣢न् । सू꣡र्य꣢꣯म् । अ꣣पिन्वः । अर्कैः꣢ ॥५३४॥
स्वर रहित मन्त्र
प्र ते धारा मधुमतीरसृग्रन्वारं यत्पूतो अत्येष्यव्यम् । पवमान पवसे धाम गोनां जनयन्त्सूर्यमपिन्वो अर्कैः ॥५३४॥
स्वर रहित पद पाठ
प्र । ते । धाराः । मधुमतीः । असृग्रन् । वारम् । यत् । पूतः । अत्येषि । अति । एषि । अव्यम् । पवमान । पवसे । धाम । गोनाम् । जनयन् । सूर्यम् । अपिन्वः । अर्कैः ॥५३४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 534
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - पवमान सोमाची कृत्ये याविषयी
शब्दार्थ -
हे सोम, हे रसमय परमेश्वरा, (ते) तुझ्या (मधुमतीः) मधुर (धाराः) आनंद धारा (प्र असृग्रन्) हृदयात प्रवाहित होत आहेत. (यत्) जेव्हा (पूतः) पवित्र असा तू (अव्यम्) पार्थिव कोश म्हणजे अन्न मयकोशाला (अत्येषि) अतिक्रांत करतो. म्हणजे अन्नमयकोश ओलांडून क्रमाने प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञान मय कोशालादेखील तू जेव्हा आनंद मयकोशात अधिष्ठित होतोस तेव्हा तुझ्या मधुर आनंदधारा शरीर, प्राण, मन आणि आत्मा या सर्वांत प्रवाहित होऊ लागतात. हे (पवमान) पवित्रकारी परमेश्वरा, तू (गोनाम्) पृथ्वी आदी लोकांप्रमाणे इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, आत्मा या (धाम) स्थानांना (पवसे) पवित्र करतोस आणि (सूर्यम्) आकाशाताली सूर्याप्रमाणे अध्यात्म प्रकाश रूप सूर्यास (जनयन्) उत्पन्न करीत त्याच्य (अर्केः) किरणांनी (अपिन्वः) उपासकाच्या आत्म्याला सिंचित करतोस. म्हणजे अध्यात्म सूर्याच्या किरणांनी उपासकाच्या आत्म्यास तू भरपूर शांती देतोस.।। २।।
भावार्थ - जसे सोमरस मेंढीच्या केसांनी बनलेल्या दशापवित्र (गाळणी व चाळणी) मधून पार होतो, तेव्हा त्याच्या मधुर धारा द्रोण कलशाकडे प्रवाहित होतात. तद्वत जेव्हा परमेश्वर अ़न्नमय आदी कोश पार करून आनंदमय कोशात स्थित होतो, तेव्हा त्याच्या मधुर भक्तिधारा शरीर, मन, प्राण, बुद्धी व आत्मा या सर्व स्थानांना आप्लवित करते.।। २।।
इस भाष्य को एडिट करें