Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 542
ऋषिः - पराशरः शाक्त्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
7
म꣣ह꣡त्तत्सोमो꣢꣯ महि꣣ष꣡श्च꣢कारा꣣पां꣡ यद्गर्भोऽवृ꣢꣯णीत दे꣣वा꣢न् । अ꣡द꣢धा꣣दि꣢न्द्रे꣣ प꣡व꣢मान꣣ ओ꣡जोऽज꣢꣯नय꣣त्सू꣢र्ये꣣ ज्यो꣢ति꣣रि꣡न्दुः꣢ ॥५४२॥
स्वर सहित पद पाठम꣣ह꣢त् । तत् । सो꣡मः꣢꣯ । म꣣हिषः꣢ । च꣣कार । अ꣣पा꣢म् । यत् । ग꣡र्भः꣢꣯ । अ꣡वृ꣢꣯णीत । दे꣣वा꣢न् । अ꣡द꣢꣯धात् । इ꣡न्द्रे꣢꣯ । प꣡व꣢꣯मानः । ओ꣡जः꣢꣯ । अ꣡ज꣢꣯नयत् । सू꣡र्ये꣢꣯ । ज्यो꣡तिः꣢꣯ । इ꣡न्दुः꣢꣯ ॥५४२॥
स्वर रहित मन्त्र
महत्तत्सोमो महिषश्चकारापां यद्गर्भोऽवृणीत देवान् । अदधादिन्द्रे पवमान ओजोऽजनयत्सूर्ये ज्योतिरिन्दुः ॥५४२॥
स्वर रहित पद पाठ
महत् । तत् । सोमः । महिषः । चकार । अपाम् । यत् । गर्भः । अवृणीत । देवान् । अदधात् । इन्द्रे । पवमानः । ओजः । अजनयत् । सूर्ये । ज्योतिः । इन्दुः ॥५४२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 542
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - सोम परमात्म्याच्या महान कर्माचे वर्णऩ
शब्दार्थ -
(महिषः) महान (सोमः) सोम औषधीप्रमाणे रसाचे भंडार असणारा अथवा चंद्राप्रमाणे आल्हादक व प्रेरक परमेश्र (तत्) ते प्रसिद्ध आणि (महत्) महान कर्म (चकार) करतो (यत्) की तो (अपां गर्भः) सर्वांच्या प्राणात (गर्भामध्ये जसे शिशु) तसे विद्यमान असणारा तो परमेश्वर (देवान्) मनासह सर्व नेत्र, कर्म आदी इंद्रियांचे (अवृणीत) वरण करतो. (प्राण, मन, इंद्रिये यांना तो गीताला शक्ती देतो) (पवमानः) पवित्र करणारा तो (इन्द्रे) जीवात्म्यात आणि विद्युतेत (ओतः) पावित्र्य व शक्ती (अदधात्) स्थापित करतो. (इन्दुः) तो स्वतः प्रकाशमय असून (सूर्ये) सूर्यात (ज्योतिः) ज्योती (प्रकाश व उष्णता) (अदधात्) भरतो अथवा तोच (सूर्ये) शरीरस्य सूर्य म्हणजे नेत्राला (ज्योतिः) पाहण्याची शक्ती (अदधात्) प्रदान करतो.।। १०।।
भावार्थ - शरीराच्या मन, चक्षु, श्रोत्र आदींत जी शक्ती वा ज्योती आहे, तसेच बाह्य जगतात सूर्य, चंद्र, विद्युत, मेघ आदींत जी शक्ती वा जो-- आहे, ती त्यांना परमेश्वरानेच दिली आहे.।। १०।।
विशेष -
या मंत्रात इन्दुःचा जो पस्स्दिध अर्थ - चंद्र आहे, तो अर्थ घेतल्यास ङ्गंचंद्रमा सूर्यात ज्योती उत्पन्न करतोफ असा विरुद्ध वा निसर्ग विरोधी अर्थ निघतो. कारण की सूर्य चंद्राला जोयीत देतो, चंद्र सूर्याला नव्हे. पण ङ्गइन्दुफ शब्दाचा यौगिक अर्थ - प्रकाशमय सा घेतल्यानंतर विरोधाभास राहत नाही. ङ्गअपिफ शब्दामुळे इथे विरोधाभास अलंकार व्यंग्य आहे म्हणजे व्यंजनाशक्तीने व्यक्त होत आहे.।। १०।।