Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 661
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
14

तं꣡ त्वा꣢ स꣣मि꣡द्भि꣢रङ्गिरो घृ꣣ते꣡न꣢ वर्धयामसि । बृ꣣ह꣡च्छो꣢चा यविष्ठ्य ॥६६१॥

स्वर सहित पद पाठ

त꣢म् । त्वा꣣ । समि꣡द्भिः꣢ । सम् । इ꣡द्भिः꣢꣯ । अ꣣ङ्गिरः । घृ꣡ते꣢न । व꣣र्द्धयामसि । बृह꣢त् । शो꣣च । यविष्ठ्य ॥६६१॥


स्वर रहित मन्त्र

तं त्वा समिद्भिरङ्गिरो घृतेन वर्धयामसि । बृहच्छोचा यविष्ठ्य ॥६६१॥


स्वर रहित पद पाठ

तम् । त्वा । समिद्भिः । सम् । इद्भिः । अङ्गिरः । घृतेन । वर्द्धयामसि । बृहत् । शोच । यविष्ठ्य ॥६६१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 661
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 4; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 1; मन्त्र » 2
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ - यज्ञाग्निपक्षीं) (अन्दिर:) हे चंचल ज्वाला असणाऱ्या यज्ञाग्नी, (तं त्वा) अशा तुला आम्ही याज्ञिक जन (समिभ्दि:) समिधांद्वारे आणि (घृतेन) घृताद्वारे (वर्धयामसि) वाढवत आहोत. (यविष्ठच) अत्यंत युवा म्हणजे प्रदीप्त झालेया हे अग्नी तू (बृहव्) भरपूर, अव्यधिक (शोच) प्रज्वलित व चमकत राहा. द्वितीय अर्थ : (जीवात्म्यापक्षी) याज्ञिक मनुष्य आपल्या अंत:करणाला उद्देशून म्हणत आहे (अडि:र:) हे माझ्या कर्मशील आत्मा (तं त्वा) की जो कर्म करण्यात अतिशय दक्ष व उत्साही आहे, अशा तुला मी वा आम्ही याज्ञिकजन (समिद्भि:) ज्ञानरूप समिधांद्वारे आणि (घृतेन) सत्कर्मरूप गृताद्वारे (वर्धयामसि) वाढवितो (म्हणजे ज्ञान आणि तद्नुरूप आचरण केल्याने अंत:करण सत्कर्म करण्यास अधिकच वृद्धिंगत होते (यविष्ठ्य) हे अतिशय तरूण म्हणजे सदैव उत्साही, उद्योगी असणाऱ्या माझ्या मना, तू या जगात, समाजात (बृहत्) उरधिक याहून अधिक (शोच) चमक म्हणजे कीर्ती प्राप्त कर।। तृतीय अर्थ - (परमात्मपक्षी) (अहिर:) हे प्राणप्रिय परमेश्वरा, (तं त्वा) सर्व कर्म करण्यास समर्थ असलेल्या तुला आम्ही (सभिद्भि:) योग साधन रूप समिधांद्वारे आणि (घृतेन) स्नेहमय भक्तिभावाद्वारे आमच्या अंत:करणात (वर्धयामसि) वाढवितो (योग व भक्तीद्वारे तुझी भक्ती अधिक दृढ करतो) (यविष्ठ्य) सर्वांहून समृद्ध ऐश्वर्यशाली परमेश्वरा तू आमच्या अंत:करणात बृहत् अधिकाधिक (शोच) चमक (म्हणजे तुझा भक्तिभाव आमच्या हृदयात वाढत जावो व आम्हास प्रोत्साहित करो) ।।२।।

भावार्थ - सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी यज्ञाग्नी प्रदीप्त करावा आणि त्या ज्वालामय अग्नीप्रमाणे आपले हृदयही तेजस्वी करावे. तसेच सर्वांनी आपल्या अंतरात्म्यास उद्बोधन देत देत निर्भान्त ज्ञान संचित करीत जावे आणि योगाभ्यास व भक्तीद्वारे परमात्मरूप अग्नी आपल्या आत्म्यात प्रदीप्त करावा (म्हणजे हृदयी ईश्वर दृढ, दृढतर, दृढत्म होत जाईल) ।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top