Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 688
ऋषिः - कलिः प्रागाथः
देवता - इन्द्रः
छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती)
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम -
7
न꣢꣫ यं दु꣣ध्रा꣡ वर꣢꣯न्ते꣣ न꣢ स्थि꣣रा꣢꣫ मुरो꣣ म꣡दे꣢षु शि꣣प्र꣡मन्ध꣢꣯सः । य꣢ आ꣣दृ꣡त्या꣢ शशमा꣣ना꣡य꣢ सुन्व꣣ते꣡ दाता꣢꣯ जरि꣣त्र꣢ उ꣣꣬क्थ्य꣢꣯म् ॥६८८॥
स्वर सहित पद पाठन । यम् । दु꣣ध्राः꣢ । व꣡र꣢꣯न्ते । न । स्थि꣣राः꣢ । मु꣡रः꣢꣯ । म꣡देषु꣢꣯ । शि꣣प्र꣢म् । अ꣡न्ध꣢꣯सः । यः । आ꣣दृ꣡त्य꣢ । आ꣣ । दृ꣡त्य꣢꣯ । श꣣शमाना꣡य꣢ । सु꣣न्वते꣢ । दा꣡ता꣢꣯ । ज꣣रित्रे꣢ । उ꣣क्थ्य꣢म् ॥६८८॥
स्वर रहित मन्त्र
न यं दुध्रा वरन्ते न स्थिरा मुरो मदेषु शिप्रमन्धसः । य आदृत्या शशमानाय सुन्वते दाता जरित्र उक्थ्यम् ॥६८८॥
स्वर रहित पद पाठ
न । यम् । दुध्राः । वरन्ते । न । स्थिराः । मुरः । मदेषु । शिप्रम् । अन्धसः । यः । आदृत्य । आ । दृत्य । शशमानाय । सुन्वते । दाता । जरित्रे । उक्थ्यम् ॥६८८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 688
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 14; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 14; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 4; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात हे वर्णन केले आहे की, आचार्य ज्याचा साक्षात्कार घडवितात, तो परमेश्वर कसा आहे.
शब्दार्थ -
(शिप्रभू) सर्वान्तर्यामी (यम्) अशा ज्या परमेश्वराला त्याच्या (अन्धस:) आनन्दरस (मदेषु) देण्याच्या वा उपासकाला तृप्त करण्याच्या कार्यात (दुघ्रा:) दुर्धर शत्रुदेखील (न वरन्ते) रोखू शकत नाहीत आणि (स्थिरा: भुर:) दृढ बलशाली मनुष्यही रोकू शकत नाहीत. (तो उपासकाला आनंद देतोच देतो, त्याच्या या कार्यात कोणीही परमेश्वराला रोखू शकत नाही.) (य:) जो परमेश्वर (शशमानाय) उद्योगी व पुरुषार्थी तसेच (सुन्वते) आनंदरस वा भक्तीची कामना करणाऱ्या आपल्या (जरित्रे) उपासकासाठी (उभ्यम्) प्रशंसनीय दिव्य ऐश्वर्य (आदृश्य) आपल्या रसकोषातून काढतो आणि त्याला (दाता) देणारा होतो-देतो ।।२।।
भावार्थ - जेव्हा परमेश्वर आपल्या श्रद्धाळू उपासकावर ब्रह्मानंदाची वृष्टी करण्याची इच्छा मनात आणतो तेव्हा त्याला त्याच्या त्या कार्यापासून रोखण्याचे सामर्थ्य कोणातही नसते ।।२।। यापूर्वीच्या खंडामध्ये गुरु शिष्याचा संबंध वर्णित असून या खंडात जीवात्मा आणि परमात्म्याचे तसेच परमेश्वराचा साक्षात्कार घडविणाऱ्या आचार्यांचे वर्णन असल्यामुळे या खंडाची संगती पूर्वीच्या खंडाशी आहे, असे जाणावे ।। प्रथम अध्यायातील चतुर्थ खंड समाप्त
इस भाष्य को एडिट करें