Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 178
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
11
ए꣣षो꣢ उ꣣षा꣡ अपू꣢꣯र्व्या꣣꣬ व्यु꣢꣯च्छति प्रि꣣या꣢ दि꣣वः꣢ । स्तु꣣षे꣡ वा꣢मश्विना बृ꣣ह꣢त् ॥१७८॥
स्वर सहित पद पाठए꣣षा꣢ । उ꣣ । उषाः꣢ । अ꣡पू꣢꣯र्व्या । अ । पू꣣र्व्या । वि꣢ । उ꣣च्छति । प्रिया꣢ । दि꣣वः꣢ । स्तु꣣षे꣢ । वा꣣म् । अश्विना । बृह꣢त् ॥१७८॥
स्वर रहित मन्त्र
एषो उषा अपूर्व्या व्युच्छति प्रिया दिवः । स्तुषे वामश्विना बृहत् ॥१७८॥
स्वर रहित पद पाठ
एषा । उ । उषाः । अपूर्व्या । अ । पूर्व्या । वि । उच्छति । प्रिया । दिवः । स्तुषे । वाम् । अश्विना । बृहत् ॥१७८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 178
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात रात्र संपल्यानंतर सर्वत्र विस्तार पावलेल्या उषा हिचे वर्णन केले आहे -
शब्दार्थ -
(पहा, लक्ष द्या) (एषा उ) ही (अपूर्व्या) अपूर्व सौदर्याने परिपूर्ण आणि (प्रिया) सर्वाना प्रिय वाटणाऱ्या (उषाः) उषेप्रमाणे ही प्रकाशमयी धर्म, विद्या आदींची ज्योती (दिवः) द्युतिमान इन्द्र म्हणजे परमेश्वरापासून, आचार्यापासून वा राजापासून उत्पन्न होऊन (व्युच्छति) अधर्म, अज्ञान आदींरूप अंधकाराला विदीर्ण करीत आहे. (परमेश्वराचे वा आचार्यांचे ध्यान वा उपासना मनुष्याच्या अज्ञान, अधर्मादीच्या नाश करते) (अश्विमा) ही नैसर्गिक उषा ज्याप्रमाणे धावा - पृथ्वीला प्रकाशाने परिपूर्ण करते, तद्वत धर्म, विद्या आदींनी प्रकाशित आलेल्या हे स्त्री पुरुषहो, मी (उपासक) (वाम्ः तुम्हा सर्वांची या सत्कार्मांबद्दल (बृहत्) अतिशय (स्तुषे) प्रशंसा करीत आहे. ।। ४।।
भावार्थ - या पूर्वीच्या मंत्रात रात्र वा अंधार दूर करण्याविषयी प्रार्थना केली होती. सुदैवाने हृदयाला, राष्ट्राला व विश्वाला व्यापून असणाऱ्या रात्रीला दूर सारून आता प्रकाशमयी, विद्यारूपिणी उषा प्रगटली आहे. जसे निसर्गातील उषेमुळे द्युलोक व पृथ्वी लोक प्रकाशाने ुजळून निघतात, तसेच धर्म, विद्या, सच्चारित्रा, अध्यात्म आदींच्या ज्योतीने दीप्त दिव्य उषेच्या प्रकाशाने सर्व स्त्री- पुरुष रूप द्युलोक व पृत्वी लोक एका दिव्य ज्योतीमुळे उजळून निघाले आहेत. ।। ४।।
इस भाष्य को एडिट करें