Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 241
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - मरुतः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
7

न꣡ हि व꣢꣯श्चर꣣मं꣢ च꣣ न꣡ वसि꣢꣯ष्ठः प꣣रिम꣡ꣳस꣢ते । अ꣣स्मा꣡क꣢म꣣द्य꣢ म꣣रु꣡तः꣢ सु꣣ते꣢꣫ सचा꣣ वि꣡श्वे꣢ पिबन्तु का꣣मि꣡नः꣢ ॥२४१॥

स्वर सहित पद पाठ

न꣢ । हि । वः꣣ । चरम꣢म् । च꣣ । न꣢ । व꣡सि꣢꣯ष्ठः । प꣣रिमँ꣡स꣢ते । प꣣रि । मँ꣡स꣢꣯ते । अ꣣स्मा꣡क꣢म् । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । म꣣रु꣡तः꣢ । सु꣣ते꣢ । स꣡चा꣢꣯ । वि꣡श्वे꣢꣯ । पि꣣बन्तु । कामि꣡नः꣢ ॥२४१॥


स्वर रहित मन्त्र

न हि वश्चरमं च न वसिष्ठः परिमꣳसते । अस्माकमद्य मरुतः सुते सचा विश्वे पिबन्तु कामिनः ॥२४१॥


स्वर रहित पद पाठ

न । हि । वः । चरमम् । च । न । वसिष्ठः । परिमँसते । परि । मँसते । अस्माकम् । अद्य । अ । द्य । मरुतः । सुते । सचा । विश्वे । पिबन्तु । कामिनः ॥२४१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 241
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (अध्ययन- अध्यापनपर) हे विद्यार्थी रूप मरुत् गण (वः) तुमच्यापैकी (चरमंच न) जो बुद्धिहीनवा हीन ग्रहणशक्ती असलेला विद्यार्थी आहे. त्यालादेखील (वसिष्ठः) विद्यादायक आचार्य (नहि) (परिमंसते) सोडत नाही. अर्थात त्यालादेखील विद्येपासून वंचित ठेवत नाही. (अध) आज (सुते) या विद्या यज्ञाच्या प्रारंभी तुम्ही या. (अस्माकम्) आमचे (विश्वे) सर्व (कामिनः) विद्या ग्रहणासाठी इच्छुक (मरुतः) सहपाठी विद्यार्थी (सचा) एकत्र मिळून (पिबन्तु) विद्या रसाचे सेवन करू या.।। ङ्गमरुतः शब्दाचा यौगिक अर्थ आहे - मरणारे, मरण धर्माः ज्याअर्थी विद्यार्थी मृत्युरूप आचार्याच्या गर्भामध्ये (गुरुकुलात वा आश्रमात) राहून पूर्व- संस्कारांचा त्याग करून (म्हणजे एक प्रकारे मरण स्वीकारून) विद्येद्वारे पुनजन्म प्राप्त करतात. त्यामुळेच विद्यार्थीला ङ्गमरुत्फ म्हटले आहे. अथर्व वेदात आचार्याला अगदी स्पष्टपणे मृत्यू म्हटले आहे, ते (अथर्व. ११/५/१४) त्यातच पुढे असेही म्हटले आहे की ङ्गङ्घआचार्य उपनयन- संस्कार करून त्या ब्रह्मचारी - बालकाला आपल्या गर्भात धारण करतो, त्याला तीन रात्रीपर्यंत आपल्या उदरी ठेवतो आणि जेव्हा ब्रह्मचारी दुरा जन्म घेतो म्हणजे विद्या पूर्ण करून स्नातक होतो, त्याला पाहण्यासाठी अनेक विद्वानजन तिथे येतात. (अथर्व ११/५/३) द्वितीय अर्थ - (कर्मफल भोगपर अर्थ) - हे मरण धर्मा मनुष्यांनो, (वः) तुमचपैी (चरभं चन) एकालाही तो (वसिष्ठः) अतिशय निवासक सर्वव्यापी परमश्वर (नहि परिमंसते) कर्माचे फल दिल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे प्रथम मनुष्यापासून ते अंतिम मनुष्याला कर्माचे फळ अवश्य देतो. (अघ) आज म्हणजे वर्तमानकाळी (सुते) या उत्पन्न जगामध्ये (अस्माकम्) आमच्यापैकी (कामिनः) अभ्युदयाचे (भौतिक समृद्धीचे) इच्छुक असलेले लोकहो, या आपण (विश्वे) सर्व (मरुतः मरणधर्मा मनुष्य (सचा) सोबत राहून (पिबन्तु) कर्म फल भोगू या.।।९।।

भावार्थ - ज्याप्रमाणे वसिष्ठ परमेश्वर कोणताही अपवाद न करता सर्वांना कर्माप्रमाणे बरे वाईट फल देतो, तद्वत वसिष्ठ आचार्यानेदेखील सरल, सोप्या पद्धतीने शिष्यांना अध्यायन करावे की ज्यामळे सर्वच शिष्य निरपवाद रूपाने विद्याग्रहण कार्यी यशस्वी होतील.।।९।।

इस भाष्य को एडिट करें
Top