Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 276
ऋषिः - जमदग्निर्भार्गवः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
10

ब꣢ण्म꣣हा꣡ꣳ अ꣢सि सू꣣र्य ब꣡डा꣢दित्य म꣣हा꣡ꣳ अ꣢सि । म꣣ह꣡स्ते꣢ स꣣तो꣡ म꣢हि꣣मा꣡ प꣢निष्टम म꣣ह्ना꣡ दे꣢व म꣣हा꣡ꣳ अ꣢सि ॥२७६॥

स्वर सहित पद पाठ

ब꣢ट् । म꣣हा꣢न् । अ꣢सि । सूर्य । ब꣢ट् । आ꣣दित्य । आ । दित्य । महा꣢न् । अ꣣सि । महः꣢ । ते꣣ । सतः꣢ । म꣢हिमा꣢ । प꣣निष्टम । मह्ना꣢ । दे꣣व । महा꣢न् । अ꣣सि ॥२७६॥


स्वर रहित मन्त्र

बण्महाꣳ असि सूर्य बडादित्य महाꣳ असि । महस्ते सतो महिमा पनिष्टम मह्ना देव महाꣳ असि ॥२७६॥


स्वर रहित पद पाठ

बट् । महान् । असि । सूर्य । बट् । आदित्य । आ । दित्य । महान् । असि । महः । ते । सतः । महिमा । पनिष्टम । मह्ना । देव । महान् । असि ॥२७६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 276
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमात्म पर) (बट्) खरेच हे (सूर्य) सर्वव्यापी, सर्व जगद्त्पादक, दुष्ट प्रकंपक, सूर्यवत प्रकाशमानन आणि सर्व प्रकाशक जगदीश्वरा, तू खरचे (महान्) महान (असि) आहेस. (बट्) खरंच, हे (आदित्य) अधइनाशी परमेश्वरा, तू (महान्) परम महिमावान (असि) आहेस. हे (पनिष्टम) अत्यंत स्तुतियोग्य परब्रह्म परमेश्वरा, (महः) तू महान (सत्ः) असून (ते) तुझा (महिमा) महिमा( महान्) अपार आहे. (महृा) तुझ्या महिमेमुळे तूच (महान्) सर्वांपेक्षा महान (असि) आहेस.।। द्वितीय अर्थ - (राजापर) - (बट्) खरेच (सूर्य) राष्ट्रामध्ये सूर्याप्रमाणे विद्येचा प्रकाश फैलावणारे हे राजा, तुम्ही (महान्) मोठे दिग्विजेता (असि) आहात. हे (आदित्य) राष्ट्रभूमीचे पुत्र, म्हणजे राष्ट्रवासी नागरिकांतर्फे मतदानाद्वारे निवडलेले प्रमुख पुरुष, तुम्ही (महान्) प्रजापालन रूप महान कर्म करणारे (असि) आहात. हे (पनिष्टम्) श्रेष्ठ व्यवहार ज्ञाता, (महृः सतः) तुम्ही प्रजेसाठी पूजनीय असून (ते) तुमचा (महिमा) महिमा (महान्) खरोखर अति महान आहे. कारण तुमच्यामध्ये मनुस्मृती (७/४) त म्हटल्याप्रमाणे इंद्र, वायू, यम, सूर्य आदी सर्व देवांचे गुण विद्यमान आहेत. हे (देव) प्रजेला सुरू देणारे राजा, तुम्ही (महृा) तुमच्यातील गुणांमुळे (महान्) महान कीर्तिमान (असि) आहात.।। तृतीय अर्थ - (आचार्यपर) - (सूय़र्) प्रकाशमय सूर्याप्रमाणे विद्येच्या प्रकाशाने परिपूर्ण हे आचार्य प्रवर, आपण (बट्) खरेच (महान्) महान पांडित्ययुक्त (असि) आहात. (बट्) खरंच हे (आदित्य) आदित्य ब्रह्मचारी, आपण (महान्) महान व्रतांचे अनुष्ठान करारे (असि) आहात. हे (पनिष्टम) अत्याधिक विद्या- व्यवहार ज्ञाता, (महः सतः) आपण शिष्यांसाठी पूजनीय असून (ते) तुमचा (महिमा) महिमा अपार आहे. हे (देव) दिव्यगुण संपन्न आचार्यवर, आपण (महृा) विद्या, शिक्षण कला आदींच्या दृष्टीने (महान्) महिमाशाली (असि) आहात. ।। ४।।

भावार्थ - ब्रह्मांडात परमेश्वर, राष्ट्रात राजा आणि गुरुकुलात गुरू, हे तिघेही महान, परोपकारी व कीर्तिमान आहेत. सर्वांनी यांच्यापासून यथोचित लाभ वा उपकार घेतले पाहिजेत. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top