यजुर्वेद - अध्याय 31/ मन्त्र 7
ऋषिः - नारायण ऋषिः
देवता - स्त्रष्टश्वरो देवता
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
0
तस्मा॑द्य॒ज्ञात् स॑र्व॒हुत॒ऽऋचः॒ सामा॑नि जज्ञिरे।छन्दा॑सि जज्ञिरे॒ तस्मा॒द्यजु॒स्तस्मा॑दजायत॥७॥
स्वर सहित पद पाठतस्मा॑त्। य॒ज्ञात्। स॒र्व॒हुत॒ इति॑ सर्व॒ऽहुतः॑। ऋचः॑। सामा॑नि। ज॒ज्ञि॒रे॒ ॥ छन्दा॑सि। ज॒ज्ञि॒रे॒। तस्मा॑त्। यजुः॑। तस्मा॑त्। अ॒जा॒य॒त॒ ॥७ ॥
स्वर रहित मन्त्र
तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे । छन्दाँसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥
स्वर रहित पद पाठ
तस्मात्। यज्ञात्। सर्वहुत इति सर्वऽहुतः। ऋचः। सामानि। जज्ञिरे॥ छन्दासि। जज्ञिरे। तस्मात्। यजुः। तस्मात्। अजायत॥७॥
व्याख्यान -
प्रथम ईश्वराला नमस्कार करून व प्रार्थना करून वेदाच्या उत्पत्तीचा विषय लिहिला जात आहे. वेद कुणी उत्पन्न केलेले आहेत? (तस्मात् यज्ञात्स.) सत् ज्याचा कधी नाश होत नाही, चित् जो सदैव ज्ञानरूप असून, ज्याच्यात अज्ञानाचा लवलेशही नसतो, जो सदैव आनंदमय व सुखस्वरूप असून, सर्वांना सुख देणारा असतो. या लक्षणांनी युक्त पुरुष सर्वत्र व्याप्त आहे, परिपूर्ण आहे. जो सर्व माणसांनी उपासना करण्यायोग्य इष्टदेव व सर्व सामर्थ्याने युक्त आहे. त्याच परब्रह्मापासून (ऋच:) ऋग्वेद, (यजु:) यजुर्वेद, (सामानि) सामवेद व (छन्दांसि) अथर्ववेद हे चार वेद उत्पन्न झालेले आहेत. त्यासाठी सर्व माणसांनी वेदांचे ग्रहण करावे व वेदोक्त रीतीने आचरण करावे. ‘जज्ञिरे’ व ‘अजायत’ या दोन क्रियांच्या अधिकतेमुळे वेद अनेक विद्यांनी युक्त आहेत, असे म्हटले जाते, तसेच ‘तस्मात्’ ही दोन पदे अधिक असल्यामुळे हे निश्चित जाणले पाहिजे, की ईश्वरापासूनच वेद निर्माण झालेले आहेत. एखाद्या माणसापासून नव्हे. वेदात सर्व मंत्र गायत्री इत्यादी छंदांनीच युक्त आहेत. त्यामुळे ‘छन्दांसि’ या पदाने अथर्ववेदाच्या उत्पत्तीवर प्रकाश पडतो. शतपथ इत्यादी ब्राह्मण व वेदमंत्रांच्या प्रमाणाने हे सिद्ध होते, की यज्ञ शब्दाने विष्णू व विष्णू शब्दाने सर्वव्यापक परमेश्वराचे ग्रहण होते. कारण सर्व जगाची उत्पत्ती करणारा परमेश्वरच आहे, इतर कोणी नाही. ॥१॥
(यस्मादृचो अपा.) जो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. त्याच्यापासूनच (ऋच:) ऋग्वेद, (यजु:) यजुर्वेद, (सामानि) सामवेद व (आङ्गिरस:) अथर्ववेद, हे चारही वेद उत्पन्न झालेले आहेत. याच प्रकारे रूपकालंकाराने वेदाची उत्पत्ती ईश्वरच करतो. अथर्ववेद माझ्या मुखाप्रमाणे, सामवेद लोमाप्रमाणे, यजुर्वेद हृदयाप्रमाणे व ऋग्वेद प्राणाप्रमाणे आहे. (ब्रूहि कतम: स्विदेव स:) चारही वेद ज्याच्याद्वारे उत्पन्न झालेले आहेत, तो कोणता देव आहे? ते मला सांगा. या प्रश्नाचे उत्तर असे आहे, की (स्कम्भंतं.) जो सर्व जगाचा धारणकर्ता परमेश्वर आहे, त्याचे नाव स्कम्भ आहे. त्यालाच तुम्ही वेदांचा कर्ता जाणा व हेही जाणा, की त्याला सोडून माणसांनी उपासना करण्यायोग्य दुसरा कोणी इष्टदेव नाही. असा दुर्दैवी मनुष्य कोण असेल जो वेदकर्त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला सोडून दुसऱ्याला परमेश्वर मानून उपासना करील? ॥२॥
(एवं वा अरेऽस्य.) महाविद्वान महर्षी याज्ञवल्क्यांनी आपल्या पंडिता पत्नी मैत्रेयीला उपदेश केलेला आहे, की हे मैत्रेयी! जो आकाशापेक्षा मोठा परमेश्वर आहे त्याच्यापासनूच ऋक्, यजु:, साम व अथर्व, हे चार वेद उत्पन्न झालेले आहेत. जसा माणसाच्या शरीरातून श्वास बाहेर जातो व पुन्हा आत जातो त्याच प्रकारे सृष्टीच्या आरंभी ईश्वर वेद उत्पन्न करून जगात प्रकाश पसरवतो. प्रलयामध्ये वेद नसतात; परंतु त्याच्या ज्ञानात ते सदैव असतात. बीजांकुराप्रमाणे असतात. जसे बीजात अंकुर, प्रथमच असतो, तोच वृक्षरूप बनून बीजात असतो, याच प्रकारे वेद हे ईश्वराच्या ज्ञानात सदैव असतात. त्यांचा कधी नाश होत नाही. कारण ती ईश्वराची विद्या आहे, त्यामुळे ती नित्य आहे, हे जाणावे. ॥३॥
Acknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal