ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 95/ मन्त्र 1
प्र क्षोद॑सा॒ धाय॑सा सस्र ए॒षा सर॑स्वती ध॒रुण॒माय॑सी॒ पूः । प्र॒बाब॑धाना र॒थ्ये॑व याति॒ विश्वा॑ अ॒पो म॑हि॒ना सिन्धु॑र॒न्याः ॥
स्वर सहित पद पाठप्र । क्षोद॑सा । धाय॑सा । स॒स्रे॒ । ए॒षा । सर॑स्वती । ध॒रुण॑म् । आय॑सी । पूः । प्र॒ऽबाब॑धाना । र॒थ्या॑ऽइव । या॒ति॒ । विश्वाः॑ । अ॒पः । म॒हि॒ना । सिन्धुः॑ । अ॒न्याः ॥
स्वर रहित मन्त्र
प्र क्षोदसा धायसा सस्र एषा सरस्वती धरुणमायसी पूः । प्रबाबधाना रथ्येव याति विश्वा अपो महिना सिन्धुरन्याः ॥
स्वर रहित पद पाठप्र । क्षोदसा । धायसा । सस्रे । एषा । सरस्वती । धरुणम् । आयसी । पूः । प्रऽबाबधाना । रथ्याऽइव । याति । विश्वाः । अपः । महिना । सिन्धुः । अन्याः ॥ ७.९५.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 95; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 19; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 19; मन्त्र » 1
भावार्थ - परमात्मा उपदेश करतो, की हे माणसांनो! ब्रह्मविद्यारूपी नदी सर्व प्रकारच्या अज्ञान इत्यादी पापकांना वाहून नेते व हीच नदी भुवनत्रयांना पवित्र करते. अर्थात्, इतर भौतिक नद्या एखाद्या प्रदेशाला पवित्र करतात परंतु ही सर्वांना पवित्र करणारी आहे. त्यामुळे ती सर्वांपेक्षा विलक्षण आहे. तात्पर्य हे, की ही विद्यारूपी नदी आध्यात्मिक पवित्रतेचा संचार करते व भौतिक नदी बाह्य पवित्रतेचा संचार करते.
टिप्पणी -
कित्येक टीकाकारांनी सरस्वती शब्दाचा वास्तविक अर्थ न समजता येथे भौतिक नदी असा केलेला आहे. ती त्यांची अत्यंत चूक आहे. निघण्टुमध्ये ५७ प्रकारची वाणी असा सरस्वतीचा अर्थ असून ही, एक जलनदी असा अर्थ लावला गेला. अशा प्रकारच्या चुकांनीच वेदांचे अर्थ कलंकित केलेले आहेत. सरस्वतीचा अर्थ येथे ब्रह्मविद्यारूपी नदी असा आहे. वेदातील गूढ स्थळांना न समजता भारतवर्षात नद्यांची पूजा केली जाते. ॥१॥