यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 35
ऋषिः - मधुच्छन्दा ऋषिः
देवता - द्यावापृथिव्यौ देवते
छन्दः - भूरिक् आर्षी अनुष्टुप्,
स्वरः - गान्धारः
1
मा भे॒र्मा संवि॑क्था॒ऽऊर्जं॑ धत्स्व॒ धिष॑णे वी॒ड्वी स॒ती वी॑डयेथा॒मूर्जं॑ दधाथाम्। पा॒प्मा ह॒तो न सोमः॑॥३५॥
स्वर सहित पद पाठमा। भेः॒। मा। सम्। वि॒क्थाः॒। ऊर्ज॑म्। ध॒त्स्व॒। धिष॑णे॒ऽइति॑ धिष॑णे। वीड्वीऽइति॑ वी॒ड्वी। स॒ती॑ऽइति॑ स॒ती। वी॒ड॒ये॒था॒म्। ऊ॑र्जम्। द॒धा॒था॒म्। पा॒प्मा। ह॒तः। न। सोमः॑ ॥३५॥
स्वर रहित मन्त्र
मा भेर्मा सँविक्था ऊर्जन्धत्स्व धिषणे वीड्वी सती वीडयेथामूर्जन्दधाथाम् । पाप्मा हतो न सोमः ॥
स्वर रहित पद पाठ
मा। भेः। मा। सम्। विक्थाः। ऊर्जम्। धत्स्व। धिषणेऽइति धिषणे। वीड्वीऽइति वीड्वी। सतीऽइति सती। वीडयेथाम्। ऊर्जम्। दधाथाम्। पाप्मा। हतः। न। सोमः॥३५॥
विषय - पती-पत्नीने एकमेकाविषयी कशी वर्तणूक ठेवावी, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (कोणी विद्वान वयोवृद्ध मनुष्य पति-पत्नीस उपदेश करीत आहे अथवा परमपिता परमेश्वर वेदमंत्राद्वारे सर्व गृहस्थ स्त्री-पुरुषांना आदेश देत आहे) हे स्त्री (पत्नी) तू (विड्वी सती) शारीरिक आणि आत्मिक शक्ती युक्त होऊन आपल्या पतिपासून (मा भेः) भिऊ नकोस (मासंविक्था) भिऊन कंपित होऊ नकोस. (त्यावर प्रेम कर व त्याची प्रिय होशील, असे आचरण कर) (उर्ज्जम्) आपल्या शरीर आणि आत्म्याच्या शक्ती आणि पराक्रमाला ओळख व ती शक्ती (धत्स्व) धारण कर. (पति-पत्नीस उद्देशून) तुम्ही दोघे पति-पत्नी (धिषणे) सूर्याप्रमाणे व भूमीप्रमाणे परोपकार व पराक्रम करीत राहा. (वीडयेथाम्) दोघेही दृढ व शक्तिमान व्हा. (माझा आशीर्वाद) की तुम्ही दोघे (पाप्माः) एकमेकाच्या चुकीला किंवा अपराधाला (हतः) नष्ट करण्यास शिका (तुमच्यातील अपराध-भाव नष्ट व्हावा) आणि तुम्ही दोघे (सोम।) चन्द्राप्रमाणे आनन्द आणि शांती देणारे व्हा. (एकमेकास व सर्वांस आनन्द व शांतिदायक व्हा) ॥35॥
भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. पति-पत्नींनी एकमेकाशी असे आचरण ठेवावे की ज्यायोगे त्यांच्यामधे भय आणि उद्वेगाची भावना नष्ट होर्सल, आत्म्यात दृढता आणि उत्साह वाढेल, गृहाश्रमाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्य वृद्धी होईल आणि दोघेही एकमेकाच्या दोष व दुःखांना दूर करीत चंद्राप्रमाणे आल्हाददायक होतील. ॥35॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal