यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 14
ऋषिः - हैमवर्चिर्ऋषिः
देवता - आतिथ्यादयो लिङ्गोक्ता देवताः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
0
आ॒ति॒थ्य॒रू॒पं मास॑रं महावी॒रस्य॑ न॒ग्नहुः॑। रू॒पमु॑प॒सदा॑मे॒तत्ति॒स्रो रात्रीः॒ सुरासु॑ता॥१४॥
स्वर सहित पद पाठआ॒ति॒थ्य॒रू॒पमित्या॑तिथ्यऽरू॒पम्। मास॑रम्। म॒हा॒वी॒रस्येति॑ महाऽवी॒रस्य॑। न॒ग्नहुः॑। रू॒पम्। उ॒प॒सदा॒मित्यु॑प॒ऽसदा॑म्। ए॒तत्। ति॒स्रः। रात्रीः॑। सुरा॑। आसु॒तेत्याऽसु॑ता ॥१४ ॥
स्वर रहित मन्त्र
आतिथ्यरूपम्मासरम्महावीरस्य नग्नहुः । रूपमुपसदामेतत्तिस्रो रात्रीः सुरासुता ॥
स्वर रहित पद पाठ
आतिथ्यरूपमित्यातिथ्यऽरूपम्। मासरम्। महावीरस्येति महाऽवीरस्य। नग्नहुः। रूपम्। उपसदामित्युपऽसदाम्। एतत्। तिस्रः। रात्रीः। सुरा। आसुतेत्याऽसुता॥१४॥
विषय - कोणती वा कशा प्रकारची माणसें कीर्तिमान होतात, याविषयी -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (आतिथ्यभावनेने भारलेला एक गृहस्थ घरी आलेल्या अतिथिगणाना उद्देशून म्हणत आहे, या मंत्राचा असा प्रसंग कल्पित करता येतो) गृहस्थ म्हणत आहे - हे मनुष्यांनो (घरी झालेल्या पाहुण्यांनो) (मासरम्) ज्या महिन्यात अतिथिजन सर्वत्र रमण करतात (विशेषतः वर्षा ऋतूनंतर शरद वा हेमंत ऋतूत) त्या महिन्यात (आतिथ्यरूपम्) आतिथ्यरूप धर्माचे (मी पालन करीत आहे) (घरी येणाऱ्या पाहुण्यांमधे (महावीरस्य) महान वीरजन किंवा (नग्नहुः) नग्न (अति निर्धन, अकिंचन) जन असोत, (कोणत्याही (रूपम्) रूपधारी माणूस (उपसदाम्) घराजवळ येऊन भोजन वा इतर आतिथ्यधर्म पालनासाठी थांबत असलेल्या अतिथीजनांचा (मी) (तिस्रः) तीन (रात्रीः) रात्रीपर्यंत (निवासाची व्यवस्था करतो) (माझ्या घरी आलेले आपण सर्व अतिथीजनांना विनंती की) (एतत्) आपणांसाठी आणलेल्या या पदार्थांना वा (आसुता) सर्व उत्कृष्ट प्रकारे तयार केलेला हा (सुस) सोमरस आपण ग्रहण करा. ॥14॥
भावार्थ - भावार्थ - जे गृहस्थजन वा जे मनुष्य, धार्मिक विद्वानांचा सत्कार करतात, त्यांच्या संगतीत राहण्याची इच्छा करतात आणि इतरांना सदुपदेश करतात, ते कीर्तिमंत होतात. तसेच जे वीरांचा सन्मान करतात, दीन-दरिद्रजनांना वस्त्रादी पदार्थ दान करतात, आपल्या सेवकांच्या निवासादीची सोय करतात आणि अतिथिगणासाठी सोमरस (सारख्या उत्तम स्वास्थकारक रसांचे उत्पादन वा निर्मिती करतात,) ते गृहस्थीजन कीर्तिमंत होतात. ॥14॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal